Black-naped blue flycatcher / Black-naped monarch
मी काय पेशाने फोटोग्राफर नाही.पण
निसर्ग
आकर्षित करतोच. हि आवड किंवा छंद लागण्यामागे एक विशेष कारण आहे त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन.फोटो ३ - ४ असले तरी मला वाटत मी त्याला छंदच म्हणेन 😊
Black-naped blue flycatcher / Black-naped monarch
Hypothymis azurea
ह्या साहेबांचा फोटो इतक्या जवळून काढायला मिळाला हे माझं भाग्यच आहे.हा फोटो आमच्या घरातला आहे.घराच्या खिडक्यांना जाळी लावलेली असल्यामुळे त्याला बाहेर जाता येईना तो दार उघडं असताना आत आला,पण मस्त आरामात दोरीवर बसला होता.
जस काय घर त्याचाच आहे आणि मी त्याच्याकडे पाहुणा गेलोय.पण नंतर त्याला जाणवलं आपण कुठेतरी भलत्याच ठिकाणी आलोय.मग साहेब थोडे घाबरले आणि बाहेर जाण्यासाठी रस्ता शोधू लागले.त्या गडबडीत साहेबांच्या पायात ते कोळीष्टक अडकल.बराचवेळ त्या दोरीवर बसून बहुतेक ;आपण आत कुठून आलो?असा विचार करत असताना मी माझं फोटो काढण्याचं काम पूर्ण करून घेतल.थोड्याच वेळात अचानक डोक्यात प्रकाश पडावा त्याप्रमाणे प्रकाशाच्या दिशेने साहेबांनी भरारी घेतली आणि स्वतःच्या सुंदर घरात निघून गेले.पुन्हा कधी येणार हे विचारायचच राहून गेलं.पण एकदातरी आमच्या घरी येऊन गेले हेच मोठं भाग्य.फोटो काय एवढा खास नाही काढता आला तुमचा साहेब त्याबद्द माफ करा आणि पुन्हा या कधीतरी माझ्या घरी...
निसर्गाची कृपा अशीच राहिली तर पुढची संधी लवकरच मिळेल अशी अशा करतो...
आपल्या मातृभाषेत (मराठीत) ह्याला कोणत्या नावाने संबोधतात ह्याबद्दल कोणास माहिती असेल तर कृपया मला पण सांगा.
!!लिखाणातील चुकांबद्दल क्षमस्व!!
धन्यवाद !!!
Atharva P. Devasthali,9422630921.
Atharva P. Devasthali,9422630921.

Nice photography Atharva
ReplyDeleteमस्त लिहीलस
ReplyDeleteउत्तम फोटो, छान माहिती लिहिली आहे!
ReplyDeleteअप्रतिम छायाचित्र. उत्तम लेखन.
ReplyDeletenice keep posting
ReplyDelete