Nest:-Red-whiskered Bulbul (शिपाई बुलबुल / नारद बुलबुल)
माझ्या घराच्या पाठीमागील परिसरात हे घरटं मला आढळून आलं.ते कोणाचं आहे जाणून घ्यायचे कुतूहल होतंच.तेवढ्यात त्या घरट्यावर शिपाई बुलबुल(red whiskered bulbul) येऊन बसला/बसली .जरा जवळ जाऊन बघितलं तर असं लक्षात आल कि दोन पिल्ल अंड्यातून बाहेर आलेली होती .
खरं तर मला ती बुलबुल त्या घरट्या जवळ असतानाच दृश्य हवं होत पण मोबाईल च्या कॅमेरा ने ते शक्य झालं नाही .किवा माझ्या नशिबात नव्हत ते . पण घरट तरी जवळून बघता आल.आणि हो हि पिल्ल जिवंत आहेत.आरामात झोपलेत पण त्यांना मुंग्या त्रास देतायत.
संघर्ष चालू झालाय केव्हाचा ...जगण्यासाठीचा!!!

Comments
Post a Comment