Posts

Black-naped blue flycatcher / Black-naped monarch

Image
        मी काय पेशाने फोटोग्राफर नाही. पण   निसर्ग आकर्षित करतोच . हि आवड किंवा छंद लागण्यामागे एक विशेष कारण आहे त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन.फोटो ३ - ४ असले तरी मला वाटत मी त्याला छंदच म्हणेन 😊   Black-naped blue flycatcher /  Black-naped monarch Hypothymis azurea          ह्या साहेबांचा फोटो इतक्या जवळून काढायला मिळाला हे माझं भाग्यच आहे.हा फोटो आमच्या घरातला आहे.घराच्या खिडक्यांना जाळी लावलेली असल्यामुळे त्याला बाहेर जाता येईना तो दार उघडं असताना आत आला,पण मस्त आरामात दोरीवर बसला होता. जस काय घर त्याचाच आहे आणि मी  त्याच्याकडे पाहुणा गेलोय.पण नंतर त्याला जाणवलं आपण कुठेतरी भलत्याच  ठिकाणी आलोय.मग साहेब थोडे घाबरले आणि  बाहेर जाण्यासाठी रस्ता शोधू लागले.त्या गडबडीत साहेबांच्या पायात ते कोळीष्टक अडकल.बराचवेळ त्या दोरीवर बसून बहुतेक ;आपण आत कुठून आलो?असा विचार करत असताना मी माझं फोटो काढण्याचं काम पूर्ण करून घेतल.थोड्याच वेळात अचानक डोक्यात प्रकाश पडावा त्याप्रमाणे प्रकाशाच्य...

Nest:-Red-whiskered Bulbul (शिपाई बुलबुल / नारद बुलबुल)

Image
          माझ्या घराच्या पाठीमागील परिसरात हे घरटं मला आढळून आलं.ते कोणाचं आहे जाणून घ्यायचे कुतूहल होतंच.तेवढ्यात त्या घरट्यावर शिपाई बुलबुल(red whiskered bulbul) येऊन बसला/बसली .जरा जवळ जाऊन बघितलं तर असं लक्षात आल कि दोन पिल्ल अंड्यातून बाहेर आलेली होती .            खरं तर मला ती बुलबुल त्या घरट्या जवळ असतानाच दृश्य हवं होत पण मोबाईल च्या कॅमेरा ने ते शक्य झालं नाही .किवा माझ्या नशिबात नव्हत ते . पण घरट तरी जवळून बघता आल.आणि हो हि पिल्ल जिवंत आहेत.आरामात झोपलेत पण त्यांना मुंग्या त्रास देतायत.               संघर्ष चालू झालाय केव्हाचा ...जगण्यासाठीचा!!!